हुबळी तालुक्यातील इनामवीरापूर गावात घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणातील जखमी दलित कुटुंबाच्या प्रकृतीची मंत्री संतोष लाड यांनी विचारपूस केली. कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी इनामवीरापूर गावाला प्रत्यक्ष भेट दिली.


स्वातंत्र्याला ८० वर्षे होऊनही अशा घटना घडणे दुर्दैवी असून समाजात समानता येणे गरजेचे आहे, अशी भावना मंत्री संतोष लाड यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन, डॉक्टर आणि पोलिसांनी वेळेत मदत केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या पीडीओला निलंबित करण्यात आले असून, इतर कोणत्याही विभागाने दुर्लक्ष केले असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. लवकरच गावात समुपदेशन करण्यात येईल आणि गृहमंत्री व समाजकल्याण मंत्र्यांशी चर्चा करून कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासनही मंत्री संतोष लाड यांनी दिले.
कॅबिनेट फेरबदलाबाबत मला माहिती नाही. हायकमांड, सीएम आणि डीसीएम हा निर्णय घेऊ शकतात. जो अजेंडा आहे त्यावरच चर्चा होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळचे सीएम असे बोलत आहेत. काँग्रेसला देशाचा इतिहास माहित आहे आणि काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. भाजपकडे ताकद असेल तर त्यांनी करून दाखवावे. आम्हाला बहुमत मिळाले आहे, ते सरकार अस्थिर कसे करू शकतात? सत्तावाटप हा आता संपलेला विषय आहे. विरोधकांनी विचारल्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट उत्तर दिले आहे असे मंत्री संतोष लाड यांनी स्पष्ट केले.


Recent Comments