बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर कजे आयुर्वेदिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेत बेळगावचे डॉ. महांतेश रामण्णवर यांना ‘आयुर्वेद विश्वरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुर्वेदिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन आणि समर्पित सेवेची दखल घेऊन हा बहुमान प्रदान करण्यात आला.

डॉ. महांतेश रामण्णवर हे केएलई संस्थेच्या बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयातील शरीर रचना विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणूनही ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. या सोहळ्याचे आयोजक डॉ. गिरधर कजे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या भव्य सोहळ्याला केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ गुरुराज करजगी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी डॉ. रामण्णवर यांच्या कार्याचे कौतुक करत आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवद्गार काढले. या पुरस्कारामुळे बेळगावच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Recent Comments