Chikkodi

ग्रामीण भागातील प्रतिभेला व्यासपीठ देण्याचा सतीश शुगर अवॉर्डचा उद्देश : प्रियांका जारकीहोळी

Share

ग्रामीण भागातील कलाकारांच्या अंगी असलेल्या प्रतिभेला योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळावे, याच उद्देशाने सतीश शुगर अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली.

चिक्कोडी शहरातील कीवड मैदानावर उद्या आयोजित दुसऱ्या सतीश शुगर अवॉर्डच्या ग्रँड फिनालेच्या पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. आपले वडील आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून चिक्कोडीमधील हा दुसरा सोहळा आहे. या कार्यक्रमात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील प्रत्येक तालुक्यातील निवड प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सतीश जारकीहोळी आणि राहुल जारकीहोळी उपस्थित राहणार आहेत. चिक्कोडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बालकलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी खासदारांनी विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांची निवेदने स्वीकारली.

याप्रसंगी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काँग्रेस नेते प्रभाकर कोरे, रामकृष्ण पानगुडे, गणेश मोहिते, शिवानंद मर्याई, एच. एस. नसलापुरे, रियाज चौगला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: