राज्यातील निर्लज्ज काँग्रेस सरकारला जनता कंटाळली असून, नगर पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आगामी विधानसभा निवडणुकीचे दिकसूचक आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केले.

‘वीर बाल दिना’च्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाने नेहमीच सर्व जाती-धर्माच्या घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या केवळ ओरड करत असून, या सरकारमुळे राज्यातील एकही नागरिक सुखी नाही. सत्ता मिळाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे, असे त्यांनी म्हटले.
सरकारने किसान सन्मान आणि शेतकरी विद्यानिधी सारख्या लोकोपयोगी योजना बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. राज्यात भीषण अतिवृष्टी झालेली असतानाही हे निर्लज्ज सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारपूस करायला तयार नाही. १४० आमदार निवडून आल्याच्या गर्वात काँग्रेसला सत्तेची प्रचंड नशा चढली असल्याची टीका त्यांनी केली.
गृहलक्ष्मी योजनेसाठी पाच हजार कोटी रुपये दिल्याची खोटी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी सभागृहात दिली असून, त्यांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप बी.वाय. विजयेंद्र यांनी केला.


Recent Comments