बेळगाव जिल्ह्यातील बाल आणि युवा कलाकारांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित दोन दिवसीय कला प्रतिभा महोत्सवाचा मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. लोकसंगीत, सुगम संगीत, हिंदुस्तानी वाद्य संगीत, शास्त्रीय नृत्य, चित्रकला आणि नाटक अशा विविध कलाप्रकारांमधील स्पर्धांचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.


कन्नड आणि संस्कृती विभाग बेळगावच्या वतीने शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात विभागीय स्तरावरील ‘कला प्रतिभा महोत्सव २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन बसवराज कट्टीमनी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष यल्लाप्पा हिम्मडी यांच्या हस्ते झाले.

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कन्नड आणि संस्कृती विभागाचे बेळगाव विभागाचे संयुक्त संचालक के. एच. चन्नूर, विविध जिल्ह्यांतून आलेले उपसंचालक आणि मान्यवर उपस्थित होते. या दोन दिवसीय महोत्सवात जिल्ह्यातील तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सोहळ्याला कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज आणि रसिक प्रेक्षकांनी मोठी हजेरी लावली होती.


Recent Comments