बागलकोट जिल्ह्यातील अमीनगड पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरजिल्हा दुचाकी चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या २१ दुचाकी जप्त केल्या आहेत.

हुलगाप्पा हनुमंत मोडेकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील बिजासपूर गावचा रहिवासी आहे. हा आरोपी विविध जिल्ह्यांमध्ये फिरून दुचाकींची चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ पल्सर, ६ होंडा शाइन, ३ एचएफ डिलक्स, २ स्प्लेंडर प्लस, २ युनिकॉर्न, १ ग्लॅमर आणि १ हिरो होंडा अशा एकूण २१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील अमीनगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून या चोरट्याला जेरबंद केले असून, या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Recent Comments