बैलहोंगल तालुक्यातील नयानगर गावात एका तरुणाने मलप्रभा नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाची ओळख पटली असून सरताज जैनुल्ला तेरगी असे त्याचे नाव आहे. तो बैलहोंगल शहरातील देशनूर चाळ येथील रहिवासी होता. बुधवारी संध्याकाळी ‘कामाला जातो’ असे घरच्यांना सांगून तो घराबाहेर पडला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नयानगर जवळील नदीकाठी रस्त्याच्या कडेला एक दुचाकी उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर या प्रकरणाचा संशय बळावला.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम राबवली. या शोध मोहिमेनंतर सरताजचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments