बेळगाव डीसीसी बँकेच्या १२०० सोसायट्यांमधील ३ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना २ लाख आरोग्य, १० लाख नैसर्गिक मृत्यू आणि २० लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल,” अशी घोषणा अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी केली.

एकसंबा येथील ‘प्रेरणा उत्सवात’ बोलताना अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले की, बेळगाव डीसीसी बँकेच्या ठेवींमध्ये दोन महिन्यांत १०० कोटींची वाढ झाली असून २०२६ पर्यंत ६०० कोटींचे उद्दिष्ट आहे. बँकेला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्याचे आमचे स्वप्न असून हालसिद्धनाथ कारखान्याप्रमाणेच हिरा आणि संगम साखर कारखान्यांचाही पुढील १० वर्षांत कायापालट केला जाईल.
आमदार शशिकला जोल्ले यांनी पती-पत्नीमधील समन्वयावर भाष्य केले. “संसारात स्त्री-पुरुषाने एकमेकांच्या सोबतीने काम केल्यास अडचणी लवकर समजतात आणि सुटतात असे त्या म्हणाल्या.
इचलकरंजी-हंचिनाळ भक्तीयोगाश्रमाचे महेशानंद स्वामीजी यांनी जोल्ले दांपत्याच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात ज्योतिबाची पालखी मिरवणूक, सामूहिक गुग्गुळोत्सव आणि व्यापारी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बीरेश्वर आणि ज्योती को-ऑप क्रेडिट सोसायट्यांच्या व्यवस्थापक आणि संचालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सदलगा येथील श्रद्धानंद स्वामीजी, हुक्केरी येथील शिवबससव स्वामीजी, अथणी येथील मरुळसिद्ध स्वामीजी यांच्यासह अप्पासाहेब जोल्ले, एम. पी. पाटील, ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, यशस्वीनी जोल्ले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments