Belagavi

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील गणेशपूर ज्योती नगर येथील हिंदू डोंबारी समाजाच्या कल्याणासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या मंत्र्यांनी या परिसराच्या विकासासाठी डिजिटल वाचनालय, समुदाय भवन आणि अंगणवाडी केंद्रासह पुनर्वसनाची मोठी घोषणा केली. केवळ गणेशपूरच नव्हे, तर संपूर्ण मतदारसंघातील जनतेची सेवा करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ज्योती नगर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प असून, नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करताना मंत्र्यांनी पुनर्वसनाची तयारी दर्शवली. रहिवाशांनी संमती दिल्यास तीन वर्षांच्या कालावधीत सुसज्ज सदनिकांचे निर्माण करून दिले जाईल, जेणेकरून या परिसराचा पूर्णपणे कायापालट होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी महेश कोलकार, मल्लेश चौगुले, बाळू देसूरकर यांसह अन्य प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: