विजापूर जिल्ह्यातील तिकोटी तालुक्यातील रत्नापूर शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ऊसाने भरलेली ट्रॉली आणि पाच एकर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे भस्मसात झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

विजापूर जिल्ह्यातील तिकोटी तालुक्यातील रत्नापूर गावात शॉर्ट सर्किटमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने प्रथम पेट घेतला आणि काही क्षणातच ही आग लगतच्या पाच एकर ऊस पिकामध्ये पसरली. हे ऊस पीक रत्नापूर येथील शेतकरी भीमू केंभावी यांच्या मालकीचे आहे. आगीची भीषणता इतकी होती की, यात ट्रॉलीसह उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही घटना तिकोटी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली आहे.


Recent Comments