चित्रदुर्गातील हिरियूर तालुक्यातील गोरलत्तू क्रॉसजवळ खाजगी स्लीपर कोच बस आणि ट्रकची भीषण धडक होऊन १७ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

ट्रकने दिलेल्या धडकेनंतर बसला अचानक लागलेल्या आगीमुळे हा मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चित्रदुर्गातील हिरियूर तालुक्यातील गोरलत्तू क्रॉसजवळ हा भीषण अपघात घडला असून ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने ही आग लागली. या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.


Recent Comments