धारवाडमध्ये भाजपच्या वतीने राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस सरकारने लागू केलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रतिबंधक विधेयकाचा निषेध करण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला.

धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यापूर्वी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून लोकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावले होते, तसाच प्रकार आता काँग्रेस सरकार करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
राज्य सरकारने स्वतःचे घोटाळे आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे द्वेषपूर्ण भाषण विधेयक आणले असून, याद्वारे सामान्य जनतेचे वाक्स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, असे भाजप कार्यकर्त्यांनी नमूद केले. राज्य सरकारने हे विधेयक तातडीने मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
जर सरकारने हे वादग्रस्त विधेयक मागे घेतले नाही, तर येणाऱ्या दिवसांत संपूर्ण कर्नाटकभर भाजपच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.


Recent Comments