State

हायकमांडचा निर्णयच अंतिम; नेतृत्व बदलाच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट

Share

कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडलेले विचार सर्वांनी मान्य केलेच पाहिजेत,” असे म्हणत त्यांनी पक्षशिस्तीवर भर दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी खर्गे यांच्या विधानाचा जाहीर पाठिंबा दिला. पक्षापेक्षा कोणीही मोठे असू शकत नाही, हे खर्गे यांचे मत रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. नेतृत्व बदलाबाबत राहुल गांधी आणि हायकमांड जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल आणि तोच निर्णय अंतिम मानला जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

या संदर्भात आपण यापूर्वीच सभागृहात स्पष्टीकरण दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली. तसेच डी. के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे मंत्री के. एन. राजण्णा यांनी त्यांची भेट घेतली असल्यास त्यात वाद निर्माण करण्याचे काहीही कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: