विजापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, मध्यरात्री घर आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे.

चडचण, गोळसंगी, बसवनबागेवाडी आणि विजापूर शहरात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तोंडाला मास्क, डोळ्याला चष्मा आणि हातात घातक शस्त्रे घेऊन ही टोळी वावरत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरीचे हे प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. चोरांचा हा हैदोस रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Recent Comments