Dharwad

धारवाड मध्यवर्ती बस स्थानकात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Share

धारवाड येथील प्रादेशिक मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धारवाडचे जुने बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात हा मृतदेह सापडला आहे. बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने शहर पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास चक्रांना वेग दिला आहे. याप्रकरणी धारवाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतरच संबंधित व्यक्तीचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याचे वास्तव समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Tags: