State

सदाशिवनगर येथील डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी नागा साधूंची भेट

Share

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी आज नागा साधूंनी भेट देऊन त्यांना विशेष आशीर्वाद दिले. शिवकुमार यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा यावेळी साधूंनी व्यक्त केली.

बेंगळुरू येथील सदाशिवनगरमधील डीकेशींच्या निवासस्थानी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या १० हून अधिक नागा साधूंनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याआधीही या नागा साधूंच्या पथकाने डी. के. शिवकुमार यांना आशीर्वाद दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःहून निवासस्थानी येत शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभाशीर्वाद दिले आहेत. कालच गोकर्ण येथे गणपतीच्या उजव्या बाजूचा फुलाचा प्रसाद लाभल्यानंतर, आज नागा साधूंनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नागा साधूंचा आशीर्वाद घेतल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात असलेल्या आम्हा सर्वांना जनतेच्या आणि साधू-संतांच्या आशीर्वादाची गरज असते. आपल्या घरी चालून आलेल्यांचा अव्हेर करणे किंवा त्यांना दूर ढकलणे शक्य नसते, असे त्यांनी म्हटले.

Tags: