दिल्लीहून बेळगावकडे येणाऱ्या कर्नाटकमधील २५ हून अधिक आमदार आणि मंत्र्यांना विमानातच अडकून पडावे लागले.


रविवारी दिल्लीतील आंदोलनात भाग घेतल्यानंतर, आज बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री इंडिगो विमानातून बेळगावकडे येत होते. मात्र, वातावरणातील बदलामुळे विमान उड्डाण करू शकले नाही, परिणामी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, एच.के. पाटील, सलील नदाफ, के.जे. जॉर्ज यांच्यासह २५ हून अधिक आमदार व मंत्र्यांना सुमारे पाच तास विमानातच अडकून पडावे लागले. अखेरीस १० तासांनंतर विमानाने उड्डाण केले, अशी माहिती मिळाली आहे.


Recent Comments