हुबळीमध्ये श्री अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात आज पहाटे अचानक आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हुबळीच्या होसूर येथे आज पहाटे, अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात अय्यप्पा स्वामींचे माळाधारी भाविक ‘इरुमुडी पूजे’साठी लागणारे साहित्य आणायला गेले असताना, अचानक आग लागण्याची दुर्घटना घडली. स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना विद्यानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.


Recent Comments