जगात शांतता आणि समता कायम स्थापित व्हावी, हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते, असे प्रतिपादन दलित नेते आणि माजी नगरपरिषद अध्यक्ष उदय हुक्केरी यांनी केले.

डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज कल्याण विभाग आणि तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ तहसीलदार बलराम कट्टीमणी यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केला.
यानंतर विविध विभागाचे अधिकारी आणि दलित नेत्यांनी त्रिसरण आणि पंचशीलचे पठण करून मेणबत्त्या प्रज्वलित करुण महामानवाला अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार बलराम कट्टीमणी आणि समाज कल्याण विभागाचे सहायक संचालक गुरुशांत पावटे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले.
या वेळी बोलताना दलित नेते आणि माजी नगरपरिषद अध्यक्ष उदय हुक्केरी म्हणाले की, बाबासाहेबांना आम्हाला सोडून ५९ वर्षे उलटून गेली असली तरी, त्यांचे ज्ञान आणि विचारांच्या आधारावर संपूर्ण विश्व वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी शांतता आणि समतेचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी कर्नाटक सरकारी कर्मचारी संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश होळेप्पगोळ, तसेच दलित नेते केंपन्ना शिरहट्टी, रमेश हुंजी, किरण बागेवाडी, शशिकांत होन्नळी, के. पी. शिरगांवकर, काडप्पा होसमनी आणि अधिकारी महेश भजंत्री, एल. बी. मालदार, शेट्टेप्पा हरिजन, अरुणा इंगळे आदींची उपस्थिती होती.


Recent Comments