‘२-ए’ प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनादरम्यान पंचमसाली समाजावर झालेल्या पोलीस अत्याचाराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी १० डिसेंबर रोजी बेळगाव येथे मूक आंदोलन करण्यात येईल, असे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी सांगितले.

चिकोडी शहरातील वकील महादेव ईटी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंचमसाली समाजावरील हल्ला विसरता येणार नाही. १० डिसेंबर हा दिवस ‘लिंगायतांवरील अत्याचार दिन’ म्हणून पाळला जाईल. यावेळी गांधी भवन येथून मूक रॅली काढण्यात येईल. सर्व जण हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करतील. आजपर्यंत कोणत्याही सरकारने लिंगायतांवर असा अत्याचार केला नाही, पण या सरकारने तो केला आहे. १० डिसेंबरच्या आंदोलनात समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच ‘२-ए’ आरक्षणासाठी आमचा लढा निरंतर सुरू राहील, असे त्यांनी म्हटले.
यावेळी महादेव ईटी, सुधाकर पाटील, चिदानंद कप्ली, जयानंद कप्ली, महादेव भेंडवाडे, अशोक हरगापूरे, विठ्ठल कोकाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments