खानापूर तालुक्यातील सावरगाळीतून हत्ती नंडगड येथील वाडीमाळ गवळीवाडा परिसरात दाखल झाले आहेत.

सुमारे चार ते सहा हत्तींचा हा कळप असून, यातील एक-दोन हत्ती कळपापासून वेगळे झाले आहेत. यापूर्वी हे हत्ती नावगा वनक्षेत्रात दिसले होते. आता सावरगाळी मार्गे नंदगडच्या गवळवाडा परिसरात आल्याने येथील भात पिकांच्या पेंढ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. वन विभागाचे अधिकारी माधुरी दळवाई, वन गस्तीचे कर्मचारी प्रशांत शंकर तारीहाळ, गुरु कुंभार यांच्यासह इतरांनी वनक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आणि मानवी वस्तीच्या ठिकाणी जनजागृती करण्याचे कार्य केले असून, परिसराची पाहणी सुरू केली आहे.


Recent Comments