शेंडूर गावातील यादव कुटुंबातील आणि अन्य ५० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून निपाणीच्या आमदार शशकला जोल्ले यांनी त्यांचे भाजपमध्ये आपुलकीने स्वागत केले.

आमदार शशकला जोल्ले यांनी सांगितले की, त्यांनी गेल्या १५ वर्षांत मतदारसंघात रस्ते, गटारे, अंगणवाडी, शाळा, मंदिरांचा जीर्णोद्धार, पिण्याचे पाणी आणि मूलभूत सुविधांची अनेक कामे केली आहेत. या कामांमुळे प्रभावित होऊन शेंडूर गावातील ५० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गावात आतापर्यंत बरीच विकास कामे झाली असून, आगामी काळात अधिक निधी आणून गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष मलगोंड पाटील, संचालक रावसाहेब फराळे, समित सासन, सिद्धू नराटे, मधुकर पाटील, गणपती चौगले, आत्माराम चौगले, शिवाजी बोंगाळे, बाबासाहेब कांबळे, चंद्रकांत माने, प्रवीण गिरी, नामदेव माने, संतोष नाईक, अनिल नाईक, शिवाजी चौगले, राजू लाड, संदीप पाटील, रमेश तोडकर यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments