निपाणी येथील बसवप्रभू अनाथ आश्रमातील ३५ अनाथ मुलांना धर्मस्थळ ग्रामविकास संस्थेकडून डॉ. वीरेंद्र हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडशीट आणि फळांचे वाटप करण्यात आले.


यावेळी बसवप्रभू अनाथ आश्रमाचे संस्थापक राजूगौडा गौराई, जिल्हा जन जागृती वेदीकेचे अध्यक्ष आणि वकील श्रीपाल मुनवल्ली, जिल्हा संचालक विठ्ठल सालियान, प्रकल्प अधिकारी मंजू नाईक, तसेच प्रकल्प कार्यालयीन कर्मचारी, पर्यवेक्षक आणि सेवा प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संचालक विठ्ठल सालियान यांनी आपले मत मांडले. “बसवप्रभू अनाथ आश्रमातील मुलांना कोणतीही कमतरता भासू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे मुलांनीही भीती न बाळगता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले भविष्य घडवावे,” अशी सूचना त्यांनी केली. धर्मस्थळ प्रकल्प नेहमीच गरजू, अनाथ आणि निराश्रितांना मदत करत आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्रीपाल मुनवल्ली यांनीही आपले मत व्यक्त केले. “निपाणी आणि धर्मस्थळात सुमारे ६५० किलोमीटरचे अंतर असले तरी पूज्य हेगडे यांची सेवाभावना संपूर्ण कर्नाटक राज्यात विस्तारलेली आहे. पूज्य महाराजांचे अनाथ, गरीब आणि गरजू लोकांवर खूप प्रेम आहे. कोणीही सेवेपासून वंचित राहू नये या हेतूने प्रत्येक अनाथ आश्रमात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी महाराजांचे आभार मानू इच्छितो,” असे ते म्हणाले.

यावेळी कृषी अधिकारी मंजुनाथ कित्तूर, लेखापरीक्षक सुरेंद्र अजगावकर, ज्ञानविकास समन्वयक ज्योती भोसले, पर्यवेक्षक सुजाता उप्पार, कार्यालयीन कर्मचारी संगमेश, मंजुनाथ, संतोष, नोडल अधिकारी देवेंद्रप्पा, सेवा प्रतिनिधी मीनाक्षी कमला यांच्यासह इतर लोक उपस्थित होते.


Recent Comments