कागवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी कागवाड तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्ते विकास आणि गटार बांधकामासह सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या कामांचे पूजन करून, त्यांना सुरुवात केली.
सोमवारी दोन कोटी रुपये खर्चाच्या उगार-शिरगुप्पी रस्त्यावरून मांजरी रस्त्याच्या सुधारणा कामासाठी त्यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर शिरगुप्पी गावातील मरगुबाई देवीच्या मंदिर परिसरातील समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर शिरगुप्पी गावातील मडिवाळ माचिदेवा समाजमंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजनही संपन्न झाले.
जोगुळ गावात रस्ते व गटार बांधकामांना आमदारांनी पूजा करून सुरुवात केली. याचप्रमाणे, लोकरू गावातील अनुसूचित जाती वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे कामही सुरू करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार राजू कागे यांनी, राज्य सरकारकडून आलेल्या विकास निधीचा सदुपयोग करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण होण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. तसेच, उपस्थित अधिकारी वीरण्णा वाली आणि कंत्राटदारांना दर्जेदार कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
उगार येथील कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नेते सहभागी झाले होते.
शिरगुप्पी आणि जोगुळ गावातील कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष पाटील, पीकेपीएस अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, अनिल करोली, राजीव कट्टोली, बसू नंद्याळ, ग्रामपंचायत अध्यक्ष काका पाटील, भीम वाक, सुरेश, कंत्राटदार सोमराज पाटील, विवेक पाटील, नंडू पाटील, सहदेव पुजारी, अक्का ताई पुजारी, शेखर पाटील, बाळगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments