हुबळीत मित्रांनीच एका तरुणाला दारू पिण्यासाठी बोलावले आणि दारूच्या नशेत त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हुबळीतील गिऱियाळ रस्त्यावर काल रात्री महेश नावाच्या तरुणाला त्याच्या मित्राने पोट आणि शरीराच्या विविध भागांवर चाकूने भोसकले. गिऱियाळ रस्त्यावरील एका बारमध्ये हे तिघे मित्र दारू पीत होते. यावेळी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. भांडण करत ते तिघे थोडे पुढे गेले आणि त्या ठिकाणी महेशवर चाकूने वार करून त्याचे मित्र पळून गेले. जखमी झालेल्या महेशने नेकारनगर येथील रमेश आणि त्याच्या मित्राने चाकू मारल्याचे सांगितले आहे. गंभीर जखमी झालेल्या महेशला ‘किम्स’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कसब्यापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments