Chikkodi

सदलगा पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव यांचे निधन

Share

सदलगा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव (वय ५२) यांचे निधन झाले.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी हिर्रेकोडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावातील केएलई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैऱ्या झाडून त्यांना सलामी दिली .

सन १९९८ मध्ये कर्नाटक पोलीस दलात दाखल झालेल्या पांडव यांनी बेळगाव, निपाणी, खडकलाट, सदलगा आणि अंकली या पोलीस ठाण्यांमध्ये सेवा केली होती. सध्या ते सदलगा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

अंत्यसंस्कारावेळी चिकोडीचे उपअधीक्षक गोपाल कृष्ण गौडर, पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, चिकोडीचे उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली, सदलगाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, विजापूर जिल्हाधिकारी चंद्रकांत लोकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: