बिहार निवडणुकीत भाजपने फसवणूक करून विजय मिळवला आहे, असा आरोप मंत्री संतोष लाड यांनी केला आहे.

आज हुबळी शहरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, फसवणूक करून निवडणूक जिंकलेले पंतप्रधान मी कधी पाहिले नाहीत. देशात बॉम्बस्फोट झाला असताना पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करून परतले. दिल्लीत स्फोट झाला असताना पंतप्रधानांनी परत यायला हवे होते, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.
संपूर्ण देशात गरिबांना जमीन देण्याची देणगी इंदिरा गांधी यांची आहे. पाकिस्तानचे विभाजन करून बांगलादेशची निर्मिती इंदिरा गांधी यांनी केली, ज्यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘आयर्न लेडी’ म्हणून संबोधले होते. अशा महान नेत्याचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील सत्ता बदलाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय हाय कमांड घेईल. याबद्दल मी जास्त बोलणार नाही.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला गेले आहेत. त्यांनी पाच प्रमुख मागण्या केंद्र सरकारसमोर ठेवल्या आहेत. आता काय होते ते पाहूया, असे ते म्हणाले.
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात या भागातील समस्यांवर चर्चा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या भागातील समस्यांवर तोडगा काढला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


Recent Comments