पूर्ववैमनस्याच्या कारणावरून हुबळीमध्ये एका तरुणाला चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हुबळीतील मंटूर रोडवर काल रात्री मल्लिकजान नावाचा तरुण आपल्या मित्रासोबत जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर टोळीने हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी मल्लिकला चाकू भोसकला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पुन्हा चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला, त्यामुळे त्याला उपचारासाठी किम्स (KIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेत मल्लिकचा मित्र हल्ल्यातून बचावला आणि पळून जाण्यात यशस्वी झाला. चाकू हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. किम्स रुग्णालयात पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी बेंडीगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments