


कित्तूर आणि एम.के. हुबळी या दोन्ही शहरांमध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी इंदिरा कॅन्टीन योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना सोयीचे व्हावे म्हणून ही योजना लागू करण्यात आली असून कित्तूर मतदारसंघात दीर्घकाळची मागणी असलेल्या इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
याचवेळी एम.के. हुबळी शहरात नवीन अंगणवाडी केंद्र आणि “नम्म क्लिनिक” चे उद्घाटनही पार पडले. कार्यक्रमात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की— राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ही योजना लागू केली आहे. इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून हजारो गरीब लोक रोजच्या आहाराची सोय मिळवत आहेत, असे त्यांनी म्हटले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “उत्तर कर्नाटक वेगळे राज्य होऊ नये, माझी ती इच्छा नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments