Kittur

राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भीषण ‘हिट अँड रन’

Share

बेळगाव जिल्ह्यांतर्गत कित्तूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वर झालेल्या एका भीषण ‘हिट अँड रन’ घटनेत एका पादचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

धारवाडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या व्यक्तीला धडक दिली आणि चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या भीषण अपघातात एका पादचारी व्यक्तीचा घटनास्थळीच करुण अंत झाला आहे.

धारवाडकडून बेळगावच्या दिशेने अतिवेगाने धावत असलेल्या एका अज्ञात वाहनाने महामार्गावरून जात असलेल्या पादचारी व्यक्तीस धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनधारक फरार झाला असून अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.

याबाबत कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Tags: