



बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी येथील ‘मलप्रभा सहकारी साखर कारखान्या’चा ऊस गाळप प्रारंभोत्सव आज संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम शेतकरी गीत गाऊन आणि रोपाला पाणी देऊन करण्यात आली. त्यानंतर मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये ऊस टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी, कित्तूरचे आमदार बाबाराजे पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ, सदस्य आणि शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “तोट्यात जाण्याच्या मार्गावर असलेला हा साखर कारखाना आमच्या ताब्यात आला आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा कारखाना विकसित करून दाखवू.”
“यावर्षी सुमारे ४ लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे काम आमचा मलप्रभा सहकारी कारखाना करेल,” असे त्यांनी सांगितले. तसेच, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस लावून गाळपाचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments