Dharwad

शॉर्ट सर्किटमुळे धारवाडमध्ये शर्यतीचे ‘जोड बैल’ ठार

Share

धारवाड जिल्ह्यातील शिबारगट्टी गावात रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेत रिकामी गाडी ओढण्याच्या शर्यतींमध्ये आपला ठसा उमटवणारे शर्यतीचे जोड बैल विजेच्या शॉर्ट सर्किटला बळी पडले.

धारवाड तालुक्यातील शिबारगट्टी गावात ही दुर्दैवी दुर्घटना घडली. शिबारगट्टी येथील शेतकरी उमेश पामोजी यांनी अंदाजे ७ लाख रुपये किमतीचे शर्यतीचे दोन बैल पाळले होते. हे जोड बैल धारवाड ग्रामीण भाग तसेच जिल्ह्याबाहेरील रिकामी गाडी ओढण्याच्या शर्यतीत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवत होते. हे जोड बैल शेतकरी उमेश यांचा जीव की प्राण होते. रविवारी रात्री शेतकरी उमेश यांनी घराशेजारील शेडमध्ये या बैलांना बांधले होते. मात्र, मध्यरात्री शेडमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि दोन्ही जोड बैल जागीच ठार झाले. यामुळे शेतकरी उमेश यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

या घटनेची माहिती मिळताच गरग पोलिस ठाण्याचे पोलीस, हेस्कॉमचे अधिकारी, तसेच ग्राम लेखाधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना गरग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: