राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या आपल्या शताब्दी वर्षाचा उत्साह साजरा करत आहे. तसेच, विजयादशमीच्या निमित्ताने देशभरात आरएसएसकडून भव्य ‘पथ संचलन’ आयोजित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर धारवाडमध्येही आरएसएसने अत्यंत आकर्षक आणि भव्य पथ संचलन यशस्वीरित्या पार पाडले.

धारवाड येथील के.ई. बोर्ड कॉलेजच्या मैदानावर ५ हजारांहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक जमले होते. मैदानावरून दोन तुकड्यांमध्ये त्यांनी पथ संचलनास सुरुवात केली. के.ई. बोर्ड कॉलेजच्या मैदानावरून सुरू झालेले हे संचलन धारवाडच्या प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत केसीडी मैदानावर येऊन संपले. संपूर्ण संचलनादरम्यान देशभक्तीपर घोषणा दुमदुमत होत्या. पथ संचलन ज्या मार्गावरून जात होते, तेथे अनेकांनी रांगोळ्या काढल्या होत्या आणि जागोजागी भारतमातेचे चित्रही लावले होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या अनेक नागरिकांनी गणवेशधारी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, या संचलनात लहान मुलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. पथ संचलनाच्या पार्श्वभूमीवर हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Recent Comments