राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने धारवाडमध्ये रविवारी विशाल पथसंचलन आयोजित केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयारीचा भाग म्हणून पोलिसांकडून धारवाडमध्ये रूट मार्च काढण्यात आला.

धारवाडमधील के.ई. बोर्ड्स कॉलेजच्या मैदानातून पोलीस आयुक्त एन. शशकुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांचा रूट मार्च सुरू झाला. तिथून सुरू झालेले पोलिसांचे हे पथासंचलन विविध रस्त्यांवरून मार्गक्रमण करत धारवाडच्या केसीडी मैदान येथे पोहोचले. या रूट मार्चमध्ये एक हजारहून अधिक पोलीस कान्सटेबल, पाच एसीपी , दोन डीसीपी तसेच १० सीपीआय (CPI) सहभागी झाले होते. आरएसएसच्या पथासंचलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पोलीस आयुक्त शशकुमार यांनी सांगितले. आगामी रविवारी होणाऱ्या आरएसएसच्या पथसंचलनासाठी हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था केली आहे अशी माहिती हुबळी-धारवाड शहर पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिली.
Recent Comments