BENGALURU

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांनी केली कंठीरव स्टेडियमची पाहणी

Share

कर्नाटकात अंगणवाडी योजनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी कंठीरव क्रीडांगणाची पाहणी केली.

या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, हजारोच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी भोजन व निवास व्यवस्था तसेच पार्किंग व्यवस्था यासह इतर सुविधांबाबत मंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. शामला इक्बाल, महिला व बालविकास विभागाचे संचालक महेश बाबू, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलीकरण विभागाचे संचालक राघवेन्द्र यांच्यासह क्रीडांगणाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Tags: