Khanapur

गोळीहळ्ळी येथे श्री शिवमंदिरात शिव मूर्ती आणि नंदी मूर्तीची प्रतिष्ठापना

Share

खानापूर तालुक्यातील गोळीहळ्ळी गावातील श्री शिवमंदिरात नवीन शिवमुखवटा आणि नंदी मूर्तीची प्रतिष्ठापना भक्तीभावाने पार पडली.

माजी आमदार आणि बी.डी.सी.सी. बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी विविध धार्मिक विधी आणि पूजा-अर्चा करण्यात आली. मोठ्या श्रद्धेने आणि आदराने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी मंदिराच्या पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील वयोवृद्ध नागरिकांनी अरविंद पाटील यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमात गावातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: