khanapur

गोव्यात भीषण अपघात; समोरासमोर दुचाकी धडकून दोघांचा मृत्यू

Share

गोव्यातील फोंडा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये खानापूर तालुक्यातील एका तरुणाचा समावेश आहे.

गुरुवारी दुपारी फोण्डा बेतोडा परिसरात हा भीषण अपघात झाला. या घटनेत खानापूर तालुक्यातील २२ वर्षीय आदित्य देसाई याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला योगेश पाटील गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या इशा गावसकेरी सत्तारी यांचाही मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेल्या अदिती मांजरेकर गंभीर जखमी झाल्या आहेत.

या धडकेत दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. जखमींना फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Tags: