जांबोटी-चोर्ला रस्त्यावरील हब्बनहट्टी क्रॉसजवळील ग्रीन हॉटेलजवळ कॅंटर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कुत्तलवाडी गावातील विनायक विजय कदम (२१) नावाचा टेम्पो चालक चोर्लामार्गे जांबोटी – बेळगावकडे भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी चोर्लामार्गे गोव्याकडे जाणाऱ्या स्प्लेंडर बाईकला त्याने समोरून धडक दिली.
या अपघातात बाईकस्वार दर्शन मोहन चव्हाण (२०) गंभीर जखमी झाला. त्याला खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात बाईकवर मागे बसलेला राजू कल्लप्पा शिरपूर गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत आणि जखमी दोघेही धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुक्याच्या रेवडीहाळ गावचे रहिवासी असल्याचे समजते. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Recent Comments