कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा योग्य ठिकाणी लावण्याचा आदेश दिल्याने चिक्कोडी तालुक्यातील विविध दलित संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.

चिक्कोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये चिक्कोडी तालुक्यातील विविध दलित संघटनांच्या नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीत, कर्नाटक उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाची प्रत दाखवून अभिमान व्यक्त करण्यात आला. “संविधान लागू होऊन ७५ वर्षे उलटल्यानंतर आता संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये लावण्यास परवानगी मिळाल्याने हे कौतुकास्पद आहे,” असे मत दलित नेत्यांनी व्यक्त केले.
याबाबत चिक्कोडी शहरातील वकील नंदकुमार दरबारे यांच्यासह अनेकांनी कायदेशीर लढा दिला होता. उच्च न्यायालयाने १९ जून रोजी हा आदेश दिला असून, २०२२ पासून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधण्यात आले होते, अशी माहिती दलित नेते अशोक भंडारकर, अप्पासाहेब ब्याळी, सुभाष गायगोल यांनी दिली आणि आनंद व्यक्त केला.
Recent Comments