बागलकोट जिल्ह्यातील वीरपूर पुनर्वसन केंद्राजवळ माणुसकीला लाजवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पिशवीत नवजात बालिका आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि त्या बाळाला वाचवले. यावेळी एका स्थानिक महिलेने तातडीने मायेची पाखर घालत बाळाला स्तनपान दिले आणि तिचा जीव वाचवला. या कृतीने तिने माणुसकीचे सर्वोच्च दर्शन घडवले आहे.
ही घटना बागलकोट तालुक्यातील वीरपूर पुनर्वसन केंद्राजवळ घडली. बाळगी झाल्यानंतर मुलगी झाल्याच्या कारणावरूनच मातेने बाळाला टाकून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जिल्हा बाल संरक्षण विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यांनी बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना कलादगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
Recent Comments