Chikkodi

मजलट्टी महाविद्यालयात नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन

Share

मजलट्टी महाविद्यालय हे संपूर्ण राज्यात गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन नावाजलेले आहे, असे आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले.

चिक्कोडी तालुक्यातील मजलट्टी येथील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात विवेकानंद वर्गखोली योजनेंतर्गत १ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीच्या कामाला सुरुवात करून आमदार दुर्योधन ऐहोळे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयाला आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच गुणवत्तापूर्ण अध्यापन करणारे अतिथी व्याख्याते नियुक्त करावेत, असेही ते म्हणाले.

माजी जिल्हा परिषद सदस्य महेश भाते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद कोळी, विजय कोठीवाले, अण्णासाहेब खेमलापुरे, जी.पी. तांगडी, राजू हरगन्नवर, राजू नायिक, जी.एस. कामकर, तुक्कपन्ना सनदी, मारुती खोत, दुंडप्पा चौगला, राजू सनदी, तसेच कंत्राटदार राजू नायिक आदी उपस्थित होते. हनुमंत ठक्कनवर यांनी स्वागत केले, तर आर.बी. पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

Tags: