Bagalkot

बागलकोटमध्ये ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा

Share

आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बागलकोट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञाविधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बागलकोट जिल्ह्यातील एकूण ४ लाख शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. या कार्यक्रमात १६०० पोलीस, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर कुरेर म्हणाले, अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जर कोणाला अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास, ती तात्काळ पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी. तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये.

याप्रसंगी बागलकोटचे जिल्हाधिकारी संगप्पा एम., पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: