बागलकोट जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून संगप्पा एम. यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी जानकी के. एम. यांनी नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि सूत्रे सोपवली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर कुरेर, उपविभागीय अधिकारी संतोष जगलासर, श्वेता बीडिकर यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार आणि जिल्हास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पुष्प अर्पण करून नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
नवीन जिल्हाधिकारी संगप्पा एम. हे बागलकोट जिल्ह्यातील बळ्ळारी तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण बळ्ळारी, मुधोळ आणि बागलकोटमध्ये पूर्ण केले आहे. माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बागलकोटमधील बसवेश्वर महाविद्यालयातून घेतले, तर एम.एससी. मायक्रोबायोलॉजीची पदवी त्यांनी बेंगळुरू येथील जीकेव्हीके महाविद्यालयातून संपादन केली आहे.
Recent Comments