खानापूरच्या समाजसेविका दीपा पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी ‘राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना ‘आदर्श समाजभूषण’ हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खानापूर तालुक्यातील समाजसेविका, खानापूर ब्लॉक काँग्रेस महिला ग्रामीण युनिटच्या अध्यक्षा, बिडी ग्रामपंचायत सदस्या आणि श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या जिल्हा युनियन सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या दीपा पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवा संस्थेने घेतली. या संस्थेने त्यांना ‘राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड – 2005, आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत दीपा पाटील यांना हा पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल दीपा पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Recent Comments