Uncategorized

कौशल्य प्रशिक्षणानंतरही शिवणयंत्रे न दिल्याने बेळगावात महिलांचा मोर्चा

Share

कौशल्य प्रशिक्षणानंतर महिलांना शिवणयंत्रे न देता फसवणूक केल्याचा आरोप करत, श्रीनगर येथील वैष्णवी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मल्लिकाजुर्न विद्यापीठाचे गुरुगौडा पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कौशल्य प्रशिक्षण केंद्रात सुमारे ३० महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना शिवणयंत्रे देण्याचे आश्वासन देऊन अनगोळ येथे बोलावून त्यांचा अपमान केल्याचा आरोप आंदोलक महिलांनी गुरुगौडा पाटील यांच्यावर केला आहे.

याठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एका प्रशिक्षणार्थी महिलेने सांगितले कि, कर्नाटक कौशल्य प्रशिक्षणांतर्गत आपण मल्लिकाजुर्न विद्यापीठात प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर आपल्याला नियमानुसार शिवणयंत्र देणे गरजेचे होते. मात्र आपल्याला शिवणयंत्र देण्यात आले नसून यामध्ये घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी गुरुगौडा पाटील यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर शिवणयंत्रे मिळवून द्यावीत, अशी मागणी आपण निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करत असल्याचे त्या म्हणाल्या.. यावेळी अखिला पठाण यांच्यासह इतर अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Tags: