Belagavi

राजकारण्यांसाठीही असावी निवृत्तीची वयोमर्यादा: आमदार भालचंद्र जारकीहोळी

Share

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींसाठीही निवृत्तीचे वय निश्चित करण्याची गरज असून, युवा पिढीला संधी देण्यासाठी वयोमर्यादेचा कायदा करावा, अशी मागणी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केली.

बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी येथे बोलताना आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभा, विधान परिषद आणि संसद सदस्यांसाठी वयोमर्यादा लागू करण्यासाठी कायदा करण्याची गरज असून, यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेत्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यासच तरुण पिढीला राजकारणात वाव मिळेल, असे ते म्हणाले.

Tags: