Belagavi

विजय कर्नाटक रक्षण वेदिकेकडून शिक्षकांचा गौरव

Share

बेळगाव येथील मारुती गल्लीतील सरकारी कन्नड आणि मराठी शाळेतील शिक्षकांचा विजय कर्नाटक रक्षण वेदिका महिला घटकातर्फे सत्कार करण्यात आला.

शिक्षक दिनानिमित्त मारुती गल्ली येथील सरकारी कन्नड आणि मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना विजय कर्नाटक रक्षण वेदिका बेळगाव जिल्हा महिला घटकातर्फे सन्मानित करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता पुजारी, उपाध्यक्ष गीता जीनबसप्पनवर, सचिव मंगला पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: