बेळगाव महापालिकेत कन्नड भाषेचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या ठरावाविषयी राज्य सरकारकडून ई-मेल प्राप्त झाला असून, महापौरांच्या मंजुरीनंतर हा विषय परिषदेच्या बैठकीत मांडला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कन्नड भाषेचा ठराव मंजूर करण्याबाबत महापालिकेला प्रशासकीय ई-मेल प्राप्त झाला आहे.

अद्याप परिषदेच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, बैठकीपूर्वी महापौरांची अनुमती घेऊन हा विषय पटलावर ठेवण्याची विनंती केली जाईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.


Recent Comments