Belagavi

“ती” बेपत्ता वृद्ध व्यक्ती अखेर कित्तूरजवळ सापडली

Share

ऑगस्ट १२ पासून बेपत्ता असलेली वृद्ध व्यक्ती अखेर कित्तूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षितपणे सापडली आहे. सार्वजनिक सहकार्य आणि सोशल मीडियाच्या मदतीने ही शोधमोहीम यशस्वी ठरली.

गेल्या १२ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या या वृद्धाचा १२ ते १६ ऑगस्टदरम्यान शोध घेण्यात येत होता. १६ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास कित्तूरपासून सहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर ही वृद्ध व्यक्ती सुरक्षित स्थितीत आढळून आली. या शोधमोहीम कालावधीत स्थानिक व्यावसायिक, नागरिक, मित्र आणि नातेवाईकांनी मोलाचे सहकार्य केले. सोशल मीडियावर नागरिकांनी दिलेली माहिती आणि परस्पर संपर्कामुळे या मोहिमेला यश आले.

या शोधमोहीम कार्यात एचईआरएफ रेस्क्यू पथकाने मुख्य भूमिका बजावली. या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिक, स्थानिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे एचईआरएफ पथकातील बसवराज हिरेमठ यांनी मनापासून आभार मानले आहेत. जनतेची मानवता, आपुलकी आणि एकजुटीमुळेच ही मोहीम यशस्वी झाल्याचे बसवराज हिरेमठ यांनी सांगितले.

Tags: