Belagavi

पुष्पा पर्वतराव यांना ‘नॅशनल रोटरी चॅम्पियन’ पुरस्कार प्रदान

Share

बेळगावच्या रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान गव्हर्नर्स एड रोटेरियन पुष्पा पर्वतराव यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित ‘नॅशनल रोटरी चॅम्पियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि उत्कृष्ट नेतृत्वगुणांची दखल घेत रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रोटेरियन यिंका बाबा लोला यांच्या हस्ते पुष्पा पर्वतराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेन्नी डी’कोस्टा, माजी गव्हर्नर अविनाश पोतदार, शरद पै, अरुण भंडारी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पुष्पा पर्वतराव यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा डॉ. स्फूर्ती आणि सचिव ज्योती कुलकर्णी यांच्यासह सर्व सदस्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Tags: